📚🖊माझी शाळा माझा उपक्रम🖊📚
✍🏻 ✍🏻 ✍🏻 ✍🏻 ✍🏻 ✍🏻
🐣रांगोळीतून अभ्यास सराव🐣
भारतीय संस्कृतीत रांगोळीचे खुप महत्व आहे. घर समारंभात आपण सुदंर रांगोळी पहात असतो. ह्याच रांगोळीला दररोज शाळेत टाकायचे हा उपक्रम सुरू केला. 🐒
पण ही रांगोळी टाकताना फक्त रांगोळीच नाही तर त्यात शब्द ,संख्या ,वाक्ये वापरून टाकायची.🐣
रांगोळी टाकण्यापूर्वी वर्गवार नियोजन केले. आदल्या दिवशी मुलांना त्यांच्या वर्गाचे नियोजन करून दिले. दुसर्या दिवशी त्या नुसार रांगोळी टाकायची.
💥 💥 💥 💥 💥 💥
उदा. _
वर्ग 1 ली शब्द वाचन🐒
वर्ग 2 री वाक्ये तयार करा🐍
वर्ग 3 री गणितातील क्रिया🐠
वर्ग 4 थी इंग्रजी शब्द वाचन🐥
यामुळे मुलांना रोज नवीन शब्द संख्या वाक्ये शोधून त्यावर रांगोळी काढायची हा छंद लागला. एक आनंद आणि उत्साह दिसून आला.
🐣 🐥 🐣 🐥 🐣 🐥
यापद्धतीने प्रत्येक वर्गासमोर रांगोळीचे नियोजन म्हणजे अभिव्यक्तीला आणि कल्पनेला वाव देणाराच आहे.
रोहिणी बा. चाटणकर
जि.प.प्रा.शा. इसेगाव
ता.अचलपूर
🍃🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁
🎋गुढीपाडवा पटवाढवा🎯
आज आपण प्रत्येक जण आपल्या जि.प.च्या शाळांना नविन रुप देतोय. ग्यानरचनावाद असो किंवा प्रग्याशोध परीक्षा असो.प्रत्येक नवीन उपक्रमांच्या माध्यमातून आपण विद्यार्थी घडवत आहोत.
गुढीपाडवाच्या निमित्ताने पटनोअंदणी पहाट किंवा पटवाढवा हा उपक्रम खरच स्तुत्य आहे. 👌🏻🙏🏻
बालकांच्या मनात शाळेसंबंधी आवड निर्माण करून शाळेत नियमित उपस्थित राहण्याची सवय त्यांना जडावी या द्रुष्टीने महाराष्ट्र शासनाने 4 ऑक्टोबर 1978 च्या शासन निर्णयाद्वारे प्रत्येक शाळेला जोडून बालवाडी सूरू केली होती.
बालकांच्या मनात शाळेसंबंधी आवड निर्माण करणे. मुक्त हालचाली , खेळ , रचनात्मक कार्यक्रम इ.द्वारा त्यांना क्रुतिशील बनवणे हे मुख्य उद्दिष्ट. ✌🏻
आजही शहरी भागातील तुलनेत ग्रामीण भागात शिक्षणाविषयी थोडी अनास्था दिसून येतेच.याची काही ठळक कारणे देखील आपण अभ्यासलीत यात मुख्यत्वे कुटुंब स्थलांतर आणि घरच्या कामात व्यस्त. अशा परिस्थितीतीतही आपण अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी दररोज शाळेत यावा ह्याच प्रयत्नात असतो.
नव्याने प्रवेशित झालेल्या मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी माहे एप्रिल पासूनच त्याच्याशी जवळीकता साधू या .काही खेळ खेळू या .
🐣 🐒🐬🐥🐒🐬🐣
🎃 गप्पा गोष्टी
🎃 रचनात्मक खेळ
🎃 बौद्धिक खेळ
🎃 जोडया लावणे
🎃 अ_ब_क लोटो
🎃 शाब्दिक खेळ
यामुळे नव्याने आलेल्या मुलांना संवाद साधताना अडचण येणार नाही. खेळ आणि गप्पांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आपलेपणा वाढतो. पुढील भागात वरील खेळाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करते.😊
रोहिणी बा. चाटणकर
जि.प.प्रा.शा. इसेगाव
ता.अचलपूर जि.अमरावती
🐣🐥🐣🐥🐣🐥🐣🐥
गणिताच्या माध्यमातून तुम्हाला सांगते
तुम्हाला किती मामा, मावशी आणि आत्या आहेत .......🤗
🐒🐣🐒🐣🐒🐣🐒
☞☞☞ चला बघुया...
1- सर्वात आधी मामाची संख्या घ्या 🐣
2- आता त्याला २ ने गुणा 🐣
3- आलेल्या उत्तरात 3 मिळवा 🐣
4- आता त्याला 5 ने गुणा 🐣
5- आलेल्या उत्तरात मावशी मिळवा 🐣
6- आलेल्या उत्तराला10 ने गुणा 🐣
7- आलेल्या उत्तरात आत्या मिळवा 🐣
8- आलेल्या संख्येतुन 150 वजा करा 🐣
आता तुम्हाला तीन अंकी संख्या मिळेल.
➜ पहिला अंक मामांचा
➜ दुसरा अंक मावशीचा
➜ तिसरा अंक आत्यांचा आहे.
बघा प्रयोग करुन. लई भारी गणित आहे।
🍧🍧🍧🍧🍧🍧
रोहिणी बा. चाटणकर
जि.प.प्रा.शा. इसेगाव
ता.अचलपूर जि.अमरावती
📱9130782477
🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮
💥माझी शाळा माझा
उपक्रम🖊📚💥
📚✏शालेय वस्तू भांडार🖋🖌📚
बरीचशी अशी आपली खेडी आजूनही आहेत जिथ शाळा तर पोहोचली पण शाळेत विद्यार्थीसाठी लागणारी लेखन साहित्य नाही📝🖊📚 .कारण त्या गावात छोटी छोटी दूकाने पण नसतात.
हा उपक्रम नक्कीच त्या शाळेसाठी उपयोगी पडणार👍🏻
सुरूवात आपण करू ☺🐣
शाळेत साधारण तीन ते चार डझन वहया , पेनचे बॉक्स , पेन्सिल , स्केच पेन, खोडरबर , शार्पनर इत्यादी आवश्यक साहित्य आणले.
📚🖊🖌🖋✏📝📚
ही जबाबदारी वरच्या वर्गातील मुलांना दिली.रोज विक्री होणाऱ्या साहित्याची नोंद कशी घ्यायची हे समजून दिले .🐣 🐥 🐣 🐥 🐣
या साठी वेळ ठरवून दिला तेवढ्या वेळात ज्यांना साहित्य हवे आहे ते खरेदी करा.💥
रोज दोन विद्यार्थी हे काम बघणार यामुळे विद्यार्थ्याना हिशोब कसा ठेवावा हे समजू लागले .🐣
याशिवाय नफा किती झाला हे पण समजले आणि नफा आलेल्या रकमेतून परत एक नवीन वस्तू आणली 🍫🍭🍬🍡
विद्यार्थी हा उपक्रम खुपच आवडीने राबवतात.
💥शब्द संकलन💥
रोहिणी बा. चाटणकर
जि.प.प्रा.शा. इसेगाव
ता.अचलपूर जि.अमरावती
📱9130782477
🌟मनोरंजक खेळ🌟
🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮
👶🏻वामन बटू👶🏻
🐳🐣🐬🐣🐳🐣?🐣?🐳🐣🐬🐣🐳
सर्व मुले गोलाकार बसवावीत पण गोलाकार बसवत असताना त्यांची तोंडे आत असावीत. छान ताठ बसावे अशी सुचना विद्यार्थी यांना द्यावी.जो ताठ बसणार नाही त्यावर राज्य.
🐣उदा. 🐒
सोहम वाकून बसला.
चल सोहम तुझ्या वर राज्य बर का! सोहम आता बाकी गोलाकार बसलेल्या मुलांच्या भोवती फिरायच आहे. सोहम पळता पळता काजलच्या डोक्यावर हात 🙆🏻 ठेवणार.सोहमच्या मागे काजल पळायला लागेल🏃🏻🏃🏻 .परत सोहम सुजलच्या डोक्यावर हात ठेवणार आहे🙆🏻. सोहमच्या मागे काजल आणि काजलच्या मागे सुजल पळायला लागतील.
पळत असताना सोहम काजलच्या जागेवर बसणार आणि काजल सुजलच्या जागेवर बसणार👫. आता सुजल एकटाच राहणार आहे.🙇🏻
त्याच्या वर राज्य देण्यात येईल.🚶🏻🏃🏻
अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. 🤗
🎃नियम 🎃
1) पहिल्या फेरीत फक्त दोघांच्या डोक्यावर हात ठेवायचा. 🐣
2 ) सर्वाना संधी द्यावी🐥
3 ) ज्या विद्यार्थीवर राज्य आले त्या विद्यार्थ्यायाला गटातील एका विद्यार्थीने एखादी गोष्ट ,कविता किंवा इतर क्रुती करून दाखव असे सांगायचे आहे. 🐣
☺धन्यवाद☺

🐣रोहिणी बा. चाटणकर
जि.प.प्रा.शा. इसेगाव
ता.अचलपूर जि.अमरावती
🙊ओळखा पाहु मी कोण🙈
खेळ म्हणजे लहान मुलांच्या जिवाचा विषय.हसत खेळत आणि ग्यानरचनावादाचा अध्यापनात सहज करता येणारा वापर 😊🌷
🐵🐣🙈🐣🙉🐣🙊🐣🐒
आपल्या ग्रामीण भागात हा खेळ मुले आवडीने खेळतात फक्त त्याचा उपयोग आपण शैक्षणिक खेळ म्हणून घेऊ या 🤗💻📝
अगदी सहज वर्गात घेता येणारा हा खेळ आहे. आपल्याला फक्त दोन गट तयार करायचे आहे. ✅
गटातील दोन विद्यार्थी वर्गाबाहेर जाऊन त्यांची नावे ठेवतील .
उदा. _
इडली सांबार 🍛
वर्गातील बाकी विद्यार्थ्यानी या दोन मुलांना टाळया वाजवून आत बोलवावे👍🏻
आता या दोन विद्यार्थ्याना एका गटातील विद्यार्थ्यानी प्रश्न विचारावेत✅
प्रश्न 🔴 तुम्ही कोण आहात ?🙄
उत्तर 🔵 आम्ही खाद्य पदार्थ आहोत.😋
प्रश्न🔴 तुम्ही कोरडे की ओले ?🤔
उत्तर🔵 एक कोरडा तर दुसरा ओला😊
प्रश्न🔴 तुम्हाला शिजवले जाते का ?😇
उत्तर🔵 एकाला वाफवले जाते तर दुसऱ्याला पातळ करून उकळले जाते🍵
प्रश्न🔴तुमचा उपयोग केव्हा ?🤔
उत्तर🔵 सकाळी अथवा सायंकाळी नाष्ट्याला😋💃🏻💃🏻
मग तुम्ही इडली सांबार 🍛 आहात😄😄👍🏻
अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. वर्गातील सर्व विद्यार्थी सहभागी होतात .यामुळे विद्यार्थ्याना प्रश्न निर्मितीची सवय लागते🤓
काही उदाहरणे घेता येतील🌷
🔮 पावभाजी
🔮 लिंबू सरबत
🔮 साखर भात
🔮 बॅट बॅल
🔮 बॅट मिन्टन
🔮वही पेन
आपण आपल्या कल्पनाही घेऊ शकता👍🏻✅
✍🏻 धन्यवाद✍🏻
शब्दांकन✍🏻
रोहिणी बा. चाटणकर
जि.प.प्रा.शा. इसेगाव
ता.अचलपूर जि.अमरावती
📱9130782477
🌞मनोरंजक खेळ🌞