मुख्यध्यापकांसाठी उपयुक्त माहिती

अ) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे

1)जनरल रजिस्टर
2)विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
3)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
4)शाळा सोडल्‍याचा दाखला आवक फाईल,
5)शाळा सोडल्‍याचा दाखला जावक रजिस्टर,
6)वार्षिक निकाल पत्रक रजिष्‍टर
7)जन्म प्रमाणपत्र फाईल,
8)सतत गैरहजर रजिस्टर,
9)शैक्षणिक सर्वे रजिस्टर,
10)आरोग्‍य तपासणी रजिष्‍टर
11)पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
12)निकाल रजिस्टर,
13)मूल्यमापन नोंदवही,
14)बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
15)अपंग विद्यार्थी रजिस्टर
16)पालक संपर्क रजिस्टर,
17)आरोग्य तपासणी रजिस्टर,
18)आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
19)परीक्षा पेपर फाईल
आ) शिक्षकांसंबंधी अभिलेखे

1)शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर
2)शिक्षक हजेरी रजिस्टर
3)भ. नि. निधी रजिस्टर,
4)शिक्षक  रजेचे रजिस्टर, व रजा अर्ज फाईल,
4)शिक्षक सुचना रजिस्टर,
5)शिक्षक हालचल रजिस्टर,
6)पाठ टाचण वही,
7)वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
8)शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर  
9)पगारपेड रजिस्टर,
10)पगारपत्रक फाईल,
11)मुख्याध्यापकांचे लॉगबुक
) आर्थिक अभिलेखे

1)सादील कँशबुक
2)सादील खर्च पावती फाईल,
3)सादील लेजरबुक,
4)स.शि.अभियान  कँशबुक
5)स.शि.अभियान खर्चाची पावती फाईल,
6)स.शि.अभियान.लेजरबुक,,
7)शाळा सुधार फंड  कँशबुक
8)शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
9)उपयोगीता प्रमाणपत्र फाईल 



कार्यालयीन इतर अभिलेखे 

1)३० सप्टेंबर EMIS / U -DISE  माहिती फाईल 
 2)३१ मार्च सांख्कीय माहिती
 3)फाईल पदभार देवघेव रजिस्टर 
 4)शालेय प्रतवारी
 5)वार्षिक कार्य योजना ( AWP &B ) 
6)शाळा विकास आराखडा 
परिपत्रकेआदेश फाईल



शासकीय योजना अभिलेखे

1)सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर 
2)शालेय पोषण आहार दैनदीन नोंद  रजिस्टर,
3)शालेय पोषण आहार  चव रजिस्टर 
4)शालेय पोषण आहार धान्य साठा  रजिस्टर
5)शालेय पोषण आहार पावती फाईल 
6)मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
7)मोफत गणवेश वाटप रजिस्टर 
8)लेखन साहित्य वाटप रजिस्टर,
9)उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
10)उपस्थिती भत्ता देयके फाईल,
11)शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

मालमत्ता नोंद

1)डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२
2)स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर




अभिलेखे  जतन कालावधी
अ.क्र. अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावजतन करावयाचा कालावधी

(01) अ सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर -कायम

(02) अ फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही -कायम

(03) अ परिपत्रके, आदेश फाईल कायम

(04) अ भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही कायम

(05) अ मुख्याध्यापकाचे लॉगबुक कायम

(06) ब रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) 30 वर्षे

(07) ब कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती 30 वर्षे

(08) ब विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल 30 वर्षे

(09) ब नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र 30 वर्षे

(10) ब रोकड वही / खतावणी (स.शि.अ.)30 वर्षे

(11) ब विद्यार्थी संचयी नोंदपत्रक 30 वर्षे

(12) ब सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे

(13) क-1 इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे 10 वर्षे

(14) क-1 शाळा सोडल्याचे दाखले 10 वर्षे

(15) क-1 फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही 10 वर्षे

(16) क-1 आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके 10 वर्षे

(17) क-1 विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके 10 वर्षे

(18) क-1 वसतिगृह खोलीभाडे नोंदवही10 वर्षे

(19) क-1 महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार 10 वर्षे

(20) क-1 फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती 10 वर्षे

(21) क-1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) 10 वर्षे

(22) क-2 जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही 5 वर्षे

(23) क-2 आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब 5 वर्षे

(24) क-2 रोकडवही (शा. पो. आ.) 5 वर्षे

(25) क-2 शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही 5 वर्षे

(26) ड सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) 18 महिने

(27) ड शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज 18 महिने



विद्यार्थी लाभाच्या योजना 
==========================================

१) उपस्थिती भत्ता
इ.१ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली

==========================================


२)मोफत गणवेश योजना
 इ.१ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

==========================================


३)मोफत लेखन साहित्य
इ.१ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

==========================================


४)शालेय पोषण आहार
इ. १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज

==========================================


५)राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना 
इ. ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
==========================================

६)मोफत पाठ्यपुस्तके
 . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
==========================================

७)मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
==========================================

८)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
==========================================

९)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली
==========================================

10)माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती  
 इ. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली
==========================================

११)परीक्षा फी ई. १० वी
(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
==========================================

११)अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती . १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही
२)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र
३)खालील व्यवसाय असावेत .
जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
==========================================

१२)अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी
अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
==========================================

13)राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
==========================================

13)राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी

१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली

==========================================

१४)अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता

५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
==========================================

१५)मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी

मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
==========================================

१६)PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 
इ. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
१)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
२) उत्पन्न १ लाखांपर्यंत
३)साक्षांकीत फोटो
४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
==========================================

१७)सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
इ. १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .
==========================================

No comments:

Post a Comment