Sunday 18 September 2016

🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮🌀🔮

    🌞मनोरंजक खेळ🌞

  🙊ओळखा पाहु मी कोण🙈

खेळ म्हणजे लहान मुलांच्या जिवाचा विषय.हसत खेळत आणि ग्यानरचनावादाचा अध्यापनात सहज करता येणारा वापर 😊🌷
    🐵🐣🙈🐣🙉🐣🙊🐣🐒
  आपल्या ग्रामीण भागात हा खेळ मुले आवडीने खेळतात फक्त त्याचा उपयोग आपण शैक्षणिक खेळ म्हणून घेऊ या 🤗💻📝

अगदी सहज वर्गात घेता येणारा हा खेळ आहे. आपल्याला फक्त दोन गट तयार करायचे आहे. ✅
   गटातील दोन विद्यार्थी वर्गाबाहेर जाऊन त्यांची नावे ठेवतील .
 उदा. _

     इडली सांबार 🍛
वर्गातील बाकी विद्यार्थ्यानी या दोन मुलांना टाळया वाजवून आत बोलवावे👍🏻

आता या दोन विद्यार्थ्याना एका गटातील विद्यार्थ्यानी प्रश्न विचारावेत✅

प्रश्न 🔴 तुम्ही कोण आहात ?🙄
उत्तर 🔵 आम्ही खाद्य पदार्थ आहोत.😋

प्रश्न🔴 तुम्ही कोरडे की ओले ?🤔
उत्तर🔵 एक कोरडा तर दुसरा ओला😊

प्रश्न🔴 तुम्हाला शिजवले जाते का ?😇
उत्तर🔵 एकाला वाफवले जाते तर दुसऱ्याला पातळ करून उकळले जाते🍵

प्रश्न🔴तुमचा उपयोग केव्हा ?🤔
उत्तर🔵 सकाळी अथवा सायंकाळी नाष्ट्याला😋💃🏻💃🏻
 मग तुम्ही इडली सांबार 🍛 आहात😄😄👍🏻

अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. वर्गातील सर्व विद्यार्थी सहभागी होतात .यामुळे विद्यार्थ्याना प्रश्न निर्मितीची सवय लागते🤓

काही उदाहरणे घेता येतील🌷

🔮 पावभाजी
🔮 लिंबू सरबत
🔮 साखर भात
🔮 बॅट बॅल
🔮 बॅट मिन्टन
🔮वही पेन
   आपण आपल्या कल्पनाही घेऊ शकता👍🏻✅

         ✍🏻 धन्यवाद✍🏻

शब्दांकन✍🏻

   रोहिणी बा. चाटणकर
जि.प.प्रा.शा. इसेगाव
ता.अचलपूर जि.अमरावती










🐣मनोरंजनाचे खेळ🐣


   🖊 📖शब्द भांडार📖🖊

सर्व मुलांना गोलाकार आत तोंड करून बसावावे.प्रत्येकाला एक कागद आणि पेन्सिल द्यावी📝 .आता सुरुवातीची दोन अक्षरे सांगायची.

उदा.🐣
 'राज 'यापासून अनेक शब्द वेगवेगळे तयार करायचे आहे. जसे_
          🌞  राज 🌞
राज + कारण = राजकारण
राज + निती = राजनिती

यात थोडा बदल करून शेवटची दोन अक्षरे  कायम ठेवायची व शब्द बनवायचे.
उदा.  वास🐣
    सु+ वास= सुवास
    वन +वास= वनवास

जास्तीत जास्त शब्द तयार करणाऱ्या विद्यार्थ्याला 🎉शब्देश्वर 🎉म्हणावे.

   🔮 रोहिणी बा. चाटणकर
    जि.प.प्रा.शा. इसेगाव
 ता.अचलपूर जि.अमरावती

No comments:

Post a Comment